Powered By Blogger

Thursday, January 17, 2013

Freedom of Injustice

                 

                'Freedom of speech' म्हणजे काय हो? बोलण्याचे स्वातंत्र्य कि काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य? केवळ विधानार्थी बोलणे कि एकदम हमरीतुमरीवर येउन बोलणे? का एकदम कोणाच्या हि भावनांना हिनावणे?
                   कारण; आता बघा, सुसंस्कृत आणि सुसज्ज अश्या पालघर येथील २ तरुणी जेव्हा अवघा महाराष्ट्र दु:खात बुडालेला असताना, 'मुंबई का बंद केली जाते वगेरे वगेरे' अशे प्रश्नवजा ताशेरे मारून ह्या म्यांडमानी  एकट्यात नव्हे तर चक्क थोबाड पुस्तकावर (फेसबुक हो!) अपडेट केलं. अवघ्या जनसागराचा रोष शिगेला पोहचू नये आणि वातावरण तापू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या सुसंस्कृत आणि जबाबदार तरुंनी विरुद्ध FIR नोंदवली. आणि नीट विचार केला तर ते योग्य सुद्धा होतंच, कारण कुठे हि अशी घटना समोर नव्हती आली कि मुंबई हि जबरदस्तीने बंद केली जात आहे, ते आपसूकच मुंबईकरांनी केवळ बाळासाहेबांच्या वर्षोनुवर्षे असलेल्या त्या जिव्हाळ्याखातीर केलं, त्यात उगीच कांगावा करण्यासारखं काहीही नव्हतं पण इथे त्या मुलींना अटक नाही झाली तोवर सगळ्यांनी गरळ ओकायला सुरवात केली, कशाच्या नावावर? तर freedom of speech च्या नावावर. इतकच नाही तर याही पुढे जाऊन पोलिसांवर पक्षपातीचा आरोप सुद्धा करण्यात आला... आणि ह्यात आणखी कहर म्हणजे कारवाई करणाऱ्या पालघर पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे आणि ठाण्याचे सुप्रीटेन्द ऑफ पोलिस रवींद्र सेनगावकर यांना निलंबित करण्यात करण्यात आलं (बातमी). का? तर म्हणे चुकीच्या कलमाखाली अटक आणि वरीष्टांचे आदेश न पाळल्यामुळे. अरे पण तुम्ही शांत डोक्याने हा का नाही विचार करत कि पोलिसांनी काही कारवाई जर नसती केली तर त्याचा काय परिणाम झाला असता? जर प्रक्षुब्ध जनतेने काही बर वाईट केलं असतं तर तेव्हा सुद्धा तुम्ही पोलिसांनाच दोषी ठरवला असतं ना?, शांतता आणि सुव्यवस्था न राखण्याच्या नावावर?. ह्या घडलेल्या प्रकारची कोणी अशा बाजूने का नाहीन दाखल घेत आहे? का फक्त पोलिसांवरच उलट्या बोंबा का मारल्या जात आहेत? आणि प्रशासनालाहि आपलीच पडती बाजू आहे असा सिद्ध करून काय मिळणार आहे? ह्या प्रकाराला राजकारण नाही म्हणत, हा तर चक्क मडयाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे.


            असाच एक प्रकार आता हल्लीच घडला आहे, आणि पुन्हा काय तर पोलिस पक्षपातीपण करतात असा फाझील कांगावा चालवला आहे.

           आता मुंबई येथे आझाद मैदानाचा ११ ऑगस्ट ला घडलेला प्रकार सगळ्यांनाच आठवत असेल, आठवत काय चांगल्याच मुठी आवळत असतील ऐकूनच, कारण काय घडल होतं आणि कोणी आणि कशासाठी केलं होतं हे सगळ्यानाचं चांगल माहित आहे. पण आपल्या सेक्युलर प्रशासनाने दरवेळे प्रमाणे याही वेळी मावळ धोरण पत्करले.


         आता ह्या घडलेल्या प्रकारावर, वाहतूक महिला पोलिस निरीक्षक सुजाता पाटील ह्यांनी मुंबई पोलिसांच्या संवाद ह्या नियतकालिकात लिहिलेल्या कवितेवरून वाद निर्माण झाला आहे. सुजात पाटील ह्यांनी, त्यांच्या कवितेत त्या दिवशी दंगल करणार्यांचा उल्लेख देशद्रोही आणि साप म्हणून केला आहे, ह्यावर त्याच दिवशी पोलिसांनी कारवाई केलेल्या एका मुस्लिम दंगेखोराने आणि काही इतर मुस्लिम संघटनेने आक्षेप घेऊन सदर कविते बद्दल तक्रार नोंदवली आहे. (यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात का?) पाटील बायिनी लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी ह्या खालील प्रमाणे आहेत..

हौसला बुलंद था, इज्जत लुट रही थी...
हिम्मत कि गद्दारोने अमर ज्योती को हाथ लगाणे कि,
काट देते उनके हाथ तो फरियाद किसिकी भी न होती
सांप को दुध पिलाकर बात करे हम भाई चारेकी...

             त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे कि पोलिसांनी अश्या दंगेखोरांचे हाथ कापायला हवे होते, म्हणजे त्यांनी पुन्हा कधी अशी हिम्मत केली नसती.

              अशी प्रक्षोभक कविता पोलिसांच्या नियतकालिकात कशीकाय छापली जाऊ शकते अशी आरोळी काही मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी लगावली आहे आणि वकील एझाज नक्वी आणि काही मुस्लिम संघटना आता प्रकाशक आणि कवियत्री यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. (बातमी)

             पण का हो?? आता कोणी freedom of speech च्या दृष्टीने का नाहीं बघत ह्या प्रकाराला? का पोलिसांना freedom of speech चा अधिकार नाही का?? कि पोलिसांना भावना नसतात? त्या दिवशी भर रस्त्यावर, मोर्च्याचा नावाखाली महिला पोलिसांशी ज्या पद्धतीने हे 'देशप्रेमी' मोर्चेकर वागले त्याला काय म्हणालं पहिले? जया  कांबळे नावाच्या गरोदर महिला पोलिसावर जे सामुहिक अत्याचार करण्यात आले ते कोणत्या सभ्यतेचा लक्षण होतं? महिला पोलिसांचे नुसते कपडेच नाही फाडले गेले तर त्यांची अब्रू सुद्धा लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा निषेध करण्याचा कोणता प्रकार आहे? अरे ज्यांनी  स्वताच्या आया बहिणींना सोडून तिकडे दुर्गम अशा परिस्थितीत देशाचं रक्षण करता करता आपले प्राण गमावले त्या शहीद स्मारकाला सुद्धा तुम्ही लाथेने हाणता? कसला आलाय इतका राग तुम्हाला? कसली चीड आहे तुम्हाला जी  अश्या पद्धतीने तुम्ही मांडत आहात? हा घडलेला प्रकार जेव्हा कळला तेव्हा आपल्या वातानुकुलीत घरात तंगड्या वर करून पडलेल्यांच्या पण जीवाची आग झाली असेल, तर मग का म्हणून आपल्याच खात्यातल्या सहकारी बहिणींची अशी विटंबना झाल्यावर कोणी गप्पं राहावं? लिहिली कविता, केला राग व्यक्त?.... का? असं कागदावर व्यक्त केलेला कवितारुपी राग चालत नाही का? मग कसं 'मोर्चे' काढावे का? जसे ह्यांनी काढले शांततेत?


          अरे कसलं आलं आहे हे Double standard? एकीकडे तुम्ही पोलिसांनी केवळ शांतता भंग होऊ नये म्हणून केलेल्या कारवाई वर, पक्षपातीपण म्हणून आक्षेप घेऊन चक्क पोलिसांना निलंबित करता आणि दुसरीकडे झालेल्या अन्यायावर हतबल होऊन जेव्हा काही बोलवा तर तुम्ही त्याही गोष्टीवर ताशेरे ओढून लिहिणार्याकडून 'apology letter' लिहून घेता? का? कसले उदाहरण तुम्ही मांडत आहात दिवस रात्र राबणाऱ्या त्या पोलिसांसमोर? अशेच जर अब्रूचे धिंडवडे निघणार असतील तर चांगलीच मुस्कटदाबी चालली आहे, म्हणजे सो कॉलड सेक्युलर लोकांची चांगलीच चंगळ आहे आता...


           सुजाता पाटील ह्या एक स्त्री आहेत , आणि एक स्त्रीच स्त्री वर झालेले अत्याचार समजू शकते, त्यात चूक ती काय? आणि लिहिलेल्या कवितेत त्यांनी फक्त त्या लोकांना साप म्हटलं आहे जे त्या दिवशी तिथे आझाद मैदानावर मोर्च्याचा नावाखाली पोलिसांवर अत्याचार करत होते, यात संपूर्ण मुस्लिम समाज आणि त्यांच्या भांवना कुठून मध्ये आल्या? त्या दिवशी जर असं कृत्य कोणी दुसर्या धर्माच्या व्यक्तीने केलं असतं तर त्याला हि साप असच म्हटलं असतं, त्यात लगेच जात आणि धर्म कुठून आली? आणि लगेच याचिका आणि तक्रारी कुठून आल्या?

           हे जे काही चाललं आहे ते फारच चुकीचं आहे, कारण ह्या अश्या प्रकाराने तुम्ही फक्त सत्याला दाबण्याचा प्रयत्न कराल पण ते जितकं दाबाल तितकं ते उफाळून समोर येईल... एकीकडे जर तुम्ही freedom of speech च्या नावाखाली पोलिसांना चिमट्यात पकडता तर दुसरीकडे त्याच freedom of speech च्या नावाखाली तुम्ही पोलिसांचा बचाव का नाही करत? काय आहे काय ह्या freedom of speech ची व्याख्या? जर नेहमीच पोलिसांनाच निशाणा करणार असाल तर पुढे भविष्यात हे फार घातक ठरेल.... as usual फक्त सामान्य माणसाला.

-A Stupid Common Man!!!!


(हे लिखाण फक्त जे चुकतंय ते दाखवण्याच्या दृष्टीने लिहिण्यात आलं आहे, उगीच ह्याला कोणत्याही प्रकारच्या वयक्तिक घ्रुनेशी जोडण्याचा प्रयत्न करू नये  -A Stupid Common Man!!!!)


फोटो सौजन्य - गूगल

Thursday, January 10, 2013

बलुतं (Baluta) Book

            खाद्या व्यक्तीची सहनशीलता किती असावी आणि खरच एखादा समाज केवळ जातिव्यवस्थेच्या आणि पारंपारिक रुढींच्या नावाखाली किती दुर्लाक्षितला जावा, याचा यथाकथित पुरावा, होय पुरावाच म्हणा कारण आजच्या पिढीचा नॅनो स्वप्नांपासून ते भव्य दिव्य मेट्रो पर्यंत इतका व्याप वाढला आहे कि असे विषय केवळ काही news चॅनलस मध्ये कधी तरी कुठे काही विपरीत घडलं तर चर्चा सत्राच्या नावाखाली विषयाची वाट सोडून भरकटताना दिसतात, पण त्यातही कित्येकदा दर्शक राजा रिमोट ने चेनल बदलून MTV लावताना दिसतो. तसं म्हंटल तर हि जातीव्यवस्थेची धगधगती आग अजूनही काही शमली नाहीं आहे, गावपातळीवर आज हि कुठे न कुठे हि आपलं विक्राळ रूप दाखवतेच. आज हि अशी अनेक खेडी आहेत जी काळाच्या अजूनही ५० वर्षे मागे आहेत. फक्त शहरी जीवनात हि आग काही प्रमाणात इतकी प्रभावी नाहीं किवा मुद्दामच तिला प्रभावी ठेवत नसावे, नाहींतर उगीच समाज व्यवस्थेच्या नावावर चालवलेल्या अगाळ राजकारणाचं पितळ उघडं होईल ह्याची धास्ती असावी. कारण कशा प्रकारचं हे जगणं असेल ह्याची कल्पना किवां सत्यस्थिती,  अप्रतिम अशा दया पवार ह्यांनी लिहिलेल्या दगडू मारुती पवार ह्यांच्या आत्मचरित्रातून बलुतं ह्या पुस्तकाद्वारे होऊ शकते.

         आता ह्याला मी केवळ मराठी साहित्य म्हणेन, उगीच दलित असा पोटशब्द जोडून त्याचं categorization करणं खरच पटत नाहीं. धर्म निरपेक्ष म्हणवून घेणारा माझा समाज, जाती आणि पोट जाती निरपेक्ष कधी होईल हे खरच एक कोडं आहे. मुळात समाजातील तृटी म्हणा कि नवल वाटावं असं जगणं अधोरेखित करण्यासाठीच कोणताही लेखक ते शब्दांकित करत असावा, पण त्याला सुद्धा जर दलित साहित्य आणि ब्राम्हणांनी लिहिलेल्या साहित्याला ब्राम्हसाहीत्या आणि कोणी अमक्या जातीच्याच अमकं साहित्य म्हणून जर संबोधायला लागलो तर हे जसं काही वाचनाचे प्रकार हे केवळ भाषा, कथा, काद्म्बार्या, कविता, ललित इ. च्या हि पलीकडे जाऊन पोटजाती पर्यंत (आता प्रकाराला संकोचित बोलू कि विस्तारित हि खरच एक गोची आहे.) न्हेनं विशेष योग्य वाटत नाहीं. पण काय करणार जित्याची खोड हि मेल्याशिवाय जात नाहीं असं काहीतरी म्हणतात ना.....ते योग्यच आहे.

       बलुतं हे केवळ पुस्तक नसून, दगडू मारुती पवार ह्याच्या आयुष्याचा एक विलक्षण असा आढावा आहे, तो आढावा मनाला इतका हुर्हुरी लावून जातो कि उत्तार्धात गर्दीतून जाताना हरवलेला दगडू शेवटी खूप काळ मनात रेंगाळत राहतो, येउन जाऊन विचारांची जंत्री डोक्यात घर करून ठिया मांडून बसते. काय झालं असेल त्या दगडूच  नंतर? काय तो असंतोष असेल जो शब्दरुपी फुटला.

     बोलणार्यांनी तर पुस्तकावर तोंडसुख घेतलं असं स्पष्ट लेखकाने नमूद केलं आहे पण बोलणार्यांना हे का नाहीं कळत कि कोण का उगीच आपल्या आयुष्यातल्या आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या चार भिंतीतल्या 'गुपित' गोष्टी अशा प्रदर्शन केल्या सारखं मांडेल?  आपल्या बायकोचं कळलेलं संभ्रमित प्रकरण असो कि आपल्या आईची वेश्या व्यवसाय करणारी बहिण जमनाबाई असो, फार धाडस लागतं अश्या गोष्टी एक लेखकाने स्वीकारून लिहिणे. पण खंत ह्याचीच आहे कि तोंडसुख घेणार्यांनी अश्या संदर्भाचा बोभाटा करणे. अन्यथा त्यांना ८०% पुस्तकात समाजाचे ते कारून व हृदय हेलावणार चित्रण दिसलं नसावं का असा प्रश्न पडतो. तोंडसुख घेणाऱ्यांची संख्या, ही पुस्तक पसंतीस उतरलेल्या समीक्षक आणि वाचकांपेक्षा फारच कमी आहे, कारण विविध थरात आणि वर्गात ह्या पुस्तकाला विशेष पसंती दिली गेली आहे.

      नाहीं म्हणालं तरी दगडू चा जीवनक्रम हा वाचकाला मध्येच धक्का देण्याचे काम इतक्याबखुबीने करत असतो कि मनात विचार येतोच, 'अर्रे रे!!! .... काय हे...'. पुस्तकाच्या उत्तार्धात, जेव्हा वाचकाची अपेक्षा असते कि आता दगडूच्या कहाणीचा शेवट आला आहे तेव्हा सई च प्रकरण मनाला चटका लावून जातं. हे प्रकरण खरच इतकं अनपेक्षित आणि साळसूद पणे लिखाणात आला आहे कि दगडू आणि सई  वेगळे होणार ह्याची कल्पना सुद्धा करवत नाहीं. आणि हे असं का घडलं त्या मागे काय कारण होतं, किती खरं होतं आणि किती खोटं ह्या अश्या प्रश्नांचं काहूर डोक्यात उठतं. नकळत वाईट वाटतं ते बकुळेच, काय झालं असेल तिचं नंतर? दगडू आणि तिची भेट घडली असेल का? ह्या गोष्टींचा न लागलेला थांगपत्ताच, कुठेतरी पुस्तक संपून देखील भंडावनाऱ्या विचारांमुळे उत्तराच्या शोधात मनात काहूर माजवून सोडतो. असाच आघात करून जाते ती जमनाबाई, आयुष्याची काय खेळी असते हे जमनाबाईची शोकांतिका सांगते. का असं घडलं असेल हे कळून राहत नाहीं. जेव्हा दगडू दादर येथे जमनाबाईला बघून तिच्या वाईट परिस्थितीत तिला न बघितल्या सारखं करतो तेव्हा वाचकाला दगदूचा राग आला नाहीं तर नवल. दगडूच हॉस्टेल जीवन हे तितकंच व्यथीत करणारं आहे.... साध शिक्षणासाठी सुद्धा किती जीवाचा आटापिटा करावा लागतो हे खरच अन्यायकारक आहे. आणि तितकच व्यथीत आई मुलाचं हॉस्टेल मधलं नातं करतं. बाबासाहेबांच्या महापारीनिर्वाना नंतर स्वतःला पुढारी म्हणवून घेणार्यांचा वागणं आणि त्यांचा सावळा कारभार आश्चर्यचकित करून टाकतो, कदाचित आज हि हे असंच काहीतरी कारण असेल ह्या समाजाच्या आजच्या फार तितक्याश्या न बदललेल्या परिस्थितीला.

     पु लं नी बलुतं बद्दल लिहिताना नमूद केलं आहे कि, इतकं जीवनाचा कारुण दर्शन घडल्यावर वाचक आपसूकच माणूस म्हणून स्वतःत योग्य ते बदल माणूसकीपायी  करून घेईल. एखाद्या साहित्याचा ह्याहून हि अधिक यश आणि गौरव तो काय असेल?

     आज दगडू केवळ पुस्तकरूपी हयात असला तरी एक विचार राहतोच मनात, दगडूच्या आयुष्यातल्या सोनेरी दिवसांची झालेली हेळसांड, गेलेला काळ कधी भरून देऊ शकतो का?
                                शिळेखाली हात होता, तरी नाहीं फोडला हंबरडा
                                किती जन्माची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा...